Breaking


असा रंगला ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा 2022 !


पुणे:  अकॅडमी पुरस्कार सोहळा (oscar awards 2022) 27 मार्च रोजी पार पडला. यावेळी जगभरातील बड्या स्टार्नी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्याच्या विजेत्यांपासून सूत्रसंचालनापर्यंत ते कलाकारांच्या आउटफिटपर्यंत सर्वाची चर्चा होते.यंदाचा सोहळाही असाच खास आणि शाही होता. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटर याठिकाणी हा सुंदर सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी 'द पॉवर ऑफ द डॉग' या चित्रपटाला सर्वाधिक नामांकनं 12 मिळाली होती. तर Dune या सिनेमाला 10 तर वेस्ट साइड स्टोरीला 7 तर किंग रिचर्डला 6 नामांकनं मिळाली होती.


चाहत्यांची प्रतीक्षा संपली : “KGF 2” चा ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित


त्यामुळे सर्वोत्कृष्ट कोण ठरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅमी शूमर, रेजिना हॉल आणि वांडा सायकस यांनी केले होते. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात Oscar Awards 2022 सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी 'CODA' हा चित्रपट ठरला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री जेसिका चेस्टेन  हिला 'द आइज ऑफ टॅमी फे' या सिनेमासाठी मिळाला.


हे आहेत ऑस्कर पुरस्कारांचे मानकरी Oscar Awards 2022

सर्वोत्कृष्ट चित्रपट- कोडा (CODA)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टेन, द आईज ऑफ टॅमी फाये (Jessica Chastain, The Eyes of Tammy Faye)


सर्वोत्कृष्ट अभिनेता- विल स्मिथ, किंग रिचर्ड (Will Smith, King Richard)


12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जेन कॅम्पियन, द पॉवर ऑफ द डॉग (Jane Campion, The Power of the Dog)


सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- बिली एलिश आणि फिनिज ओकॉनेल यांनी संगीत दिलेलं नो टाइम टू डाय (No Time to Die)


सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर- समर ऑफ सोल (Summer of Soul)


या कॅटेगरीमध्ये भारतीय माहितीपट 'रायटिंग विद फायर'ला देखील नामांकन मिळालं होतं.


सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर- हॅन्स झीमर, ड्यून (Hans Zimmer, Dune)


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल ची दरवाढ सुरुच, आठवड्यात सहाव्यांदा वाढ


सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रिनप्ले- शियान हेडर (Sian Heder, CODA)


सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- केनिथ ब्रनाघ, बेलफास्ट (Kenneth Branagh, Belfast) Oscar Awards 2022


सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्टफिल्म- द लाँग गुडबाय (The Long Goodbye)


सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म- द विंडशिल्ड पायपर (The Windshield Piper)


सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- ड्राइव्ह माय कार, जपान (Drive my Car, Japan)


सावधान ! राज्यातील "या" जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अॅरिएना डीबोस, वेस्ट साइड स्टोरी (Ariana DeBose, West Side Story)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ट्रॉय कोत्सुर (Troy Kotsur, CODA)


सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर- एन्कँटो (Encanto)


सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ग्रेग फ्रेजर, ड्युन (Greig Fraser, Dune)


सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- ड्युन (Dune)


सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट- द क्वीन ऑफ बास्केटबॉल (The Queen of Basketball)


व्हिडिओ : तब्बल 600 जवान हवेत झेपावले, भारतीय जवानांचा हा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ


सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- जो वॉकर, ड्युन (Dune)


सर्वोत्कृष्ट साऊंड- मॅक रुथ, मार्क मांगिनी, थिओ ग्रीन, डग हेम्फिल, रॉन बार्लेट (Dune)


सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- पॅट्रिस वर्मिट, शुशाना सिपॉस (Dune)


सर्वोत्कृष्ट वेशभूषा- जेनी बीवॅन (Jenny Beavan, Cruella)


सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग- लिंडा डॉड्स, स्टेफनी इन्ग्राम आणि जस्टीन राले- द आइज ऑफ टॅमी फे (The Eyes of Tammy Faye)
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा