Breaking

"आसनी" वेगवान चक्री वादळ घोंगावत येत आहे


नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने वर्षातील पहिल्या चक्री वादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ अनेक भागात नाश करू शकते. अंदाजानुसार, 21 मार्चच्या सकाळपर्यंत ते बांगलादेश आणि उत्तर म्यानमारच्या लगतच्या भागाकडे दिशा बदलू शकते. 


चक्रीवादळ आज आणि उद्या ते बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागात तसेच दक्षिण अंदमान समुद्रात कहर करू शकते. चक्रीवादळाला आसनी नाव देण्यात आलं आहे. आजपासून या चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे. 22 मार्चपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे.


आसनी  (Asani) हे नाव श्रीलंकेनं सुचवलं आहे. भारतीय तटरक्षक दलाने बंगालच्या उपसागरात आणि अंदमान-निकोबार बेटांमधील सर्व खलाशी आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

देशातील विविध राज्यात उष्णतेची लाट आली असून हे वादळ किती वेग घेईल याचा अंदाज नाही. परंतु पश्चिम भारताच्या प्रदेशात तुफानी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा