Breaking

आशा व गटप्रवर्तक एकजूटीच्या पाठपुरावाला यश, राज्य सरकारचे जुलै 2021 चे मानधन मार्चपर्यंत मिळणार !


नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभर 68 हजार आशा व 4 हजार गट प्रवर्तक कार्यरत आहेत. कोरोना काळात जीवावर उधार होऊन काम केले आहे. 2007 पासून कार्यरत आशा ना फक्त कामाप्रमाणे मोबदला अगदी तुटपुंजा मिळत होता. महाराष्ट्र शासना काहीही मोबदला देत नव्हते. यामुळे आयटक सह आशा व गट प्रवर्तक संघटना सातत्याने आंदोलन करत होत्या. 2019 - 2020 मध्ये संप राज्यभर केल्यावर कृती समितीच्या नेतृत्वाखाली केल्यावर 2020 जुलै पासून आशा ना दरमहा 2 हजार रुपये व गट प्रवर्तकांना 3 हजार रुपये मानधन राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला. 


तसेच 2021 मध्ये प्रचंड कठीण काळात कोरोना असताना 2021 मध्ये पुन्हा तीव्र संघर्ष आशांनी केला. संप जून 2021 मध्ये केल्यावर आशा च्या मानधन मध्ये दरमहा 1 हजार रुपये व गट प्रवर्तक ना 1200 रु मानधन वाढ, व 500 रु दरमहा कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महाराष्ट्र  शासनाने घेतला. मात्र अंमलबजावणी आर्थिक तरतूद झालेली नव्हती. दि 30 मार्च 2022 रोजी आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी पत्राद्वारे वरील दोन्ही निर्णय मानधन वाढ संदर्भात अंमलबजावणी होणार आहे. वरील निर्णय अंमलबजावणी व्हावी, असे जाहीर केले आहे.


तसेच 2016 पासून आशा व गट प्रवर्तक चे मानधन मध्ये केंद्र सरकारने मानधन वाढ केली नाही. गटप्रवर्तकांना फक्त प्रवास भत्ताच मिळतो या विरोधात देशभर 28, 29 मार्च 2022 रोजी देशभर आंदोलन भर उन्हात 7 लाख आशा व 80 हजार गट प्रवर्तक आंदोलन केले होते. नाशिक जिल्हा परिषद ने आशा व गट प्रवर्तक ना कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत ने दरमहा 500 रूपये द्यावा. असे पत्रक जून 2021 मध्ये काढले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी नाशिक जिल्ह्यात सर्वत्र झालेली नाही, ती त्वरित करावी. व  राज्य सरकारने केलेली मानधन वाढ रक्कम दरमहा मिळावी, आशा व गट प्रवर्तक ना किमान वेतन मिळवण्यासाठी यासाठी आयटक सह कृती समिती पाठपुरावा करत आहोत, असे महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) चे राज्य अध्यक्ष राजू देसले म्हणाले.

आशा व गटप्रवर्तक ना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य शासनाने संप काळात केलेल्या चर्चा व निर्णय ची अंमलबजावणी करावी, असेही देसले म्हणाले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा