Breaking


मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर भर दिवसा हल्ला



नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर भर दिवसा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.



दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्त्वांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.



सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केला आहे. सिसोदिया यांनीही या हल्ल्याला भाजप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पुढे ते म्हणतात, भाजपचे गुंडे केजरीवाल यांच्या घराची तोडफोड करत होते. पोलिस त्यांना थांबविण्याऐवजी घराच्या दरवाजापर्यंत घेऊन गेल्याचा गंभीर आरोप सिसोदिया यांनी केला आहे. मात्र, आपच्या या आरोपावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा