Breaking

शाहिर जगन्नाथ रत्नपारखे यांच्या मोरनृत्य कला पथकाकडून वडवणी तालुक्यात जनजागृती


शासनाच्या विविध योजनांची लोककलेव्दारे नागरिकांना दिली माहिती 


वडवणी  (लहु खारगे) : महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रम व योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविणे हा उद्देश समोर ठेवून शासनाच्या वतीने लोककलेची जोपासना करणाऱ्या कला पथकांना जनजागृती करण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने वडवणी तालुक्यातील तब्बल १८ गावांमध्ये येथील शाहिर जगन्नाथ रत्नपारखे यांच्या १० सदस्य असलेल्या मोरनृत्य कला पथकाकडून नागरिकांमध्ये जात जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला नागरिकांनाही प्रतिसाद दिला. 


मोठी बातमी : राज्यातील "या" जिल्ह्यांना पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा


याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्हा सामाजिक न्याय व विशेष न्याय विभाग यांच्या वतीने वडवणी येथील नामांकित शाहिर जगन्नाथ रत्नपारखे यांच्या मोरनृत्य कला पथक यांना वडवणी तालुक्यातील विविध १८ गावांमध्ये शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रम व योजनांचा लोककलेव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वातावरणाचे परिणाम व प्रदूषण, कोरोना महामारीबाबत आरोग्याची काळजी घेण्याविषयीची माहिती, बालविवाह बंदी कायदा, स्त्रीभ्रूण हत्या, झाडे लावा झाडे जगवा, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, पाणी आडवा पाणी जिरवा, शेतकरी आत्महत्या, गावातील जोडरस्ते, पांदणरस्ते, अनुसूचित जाती-जमातीतील मुला-मुलींना शिष्यवृत्ती, अनेक लाभदायक योजना, घरकुल आवास योजना, स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव, आदी विषयांवर वडवणी तालुक्यात जनजागृती करण्यात आली.


दरवर्षी तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची “यांनी" केली घोषणा


शाहिर जगन्नाथ रत्नपारखे यांच्या या कला पथकामध्ये प्रमुख शाहिर जगन्नाथ रत्नपारखे, पेटी वादक मुरली ओव्हाळ, ढोलकी वादक उत्तम सोनवणे, ढोलकी वादक मच्छिंद्र राऊत, गायक संताराम राठोड, कोरस अनिल सावंत, कोरस सुरेश खोटे, गायिका अरुणाबाई हाटकर, गायिका वैजंताबाई कुरकुटे, कोरस कमलबाई सोनवणे हे सदस्य या कलापथकात सहभागी झाले होते.


ब्रेकिंग : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, राज्य सरकार “ते” गुन्हे मागे घेणार


महाविकास आघाडीतील आणखी दोन मंत्री अडचणीत, गुन्हा दाखल !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा