Breaking


थेरगाव येथील अनिकेत चोधरी टोळीतील 'मोक्का’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर


पुणे : खंडणी व अपहरण गुन्ह्यांत संपूर्ण  थेरगाव परिसरात कुप्रसिध्द असलेल्या अनिकेत चोधरी  टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपी अजय सुधाकर शिरसाट याने जामिनासाठी अर्ज केला असता विशेष मोक्का न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला.


तसेच या गुन्ह्यातील एका आरोपीस उच्च न्यायालय मुंबई यांनी जमीन अर्ज मंजूर केला आहे, या प्रकरणात आरोपीचे वकील यांनी आरोपीविरुध्द चुकीची कारवाई झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातल्या काही खटल्यांची उदाहरणं (सायटेशन) दिली.


विशेष सरकारी वकील यांनी आरोपी अजय शिरसाठ कडून दोन कोयता पोलिसानी जप्त केला असून हे न्यायालयांच्या निदर्शनास आणून दिले.
  
आरोपीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई ही लागू होत नाही असे उच्च न्यायालयच्या निरिक्षण आहे. त्यामुळे  त्याला जामीन देण्यास हरकत नाही, अशी बाजू अ‍ॅड. राकेश सोनार, अ‍ॅड. योगेश ढमाळ,अ‍ॅड.विध्याधर भोसले, अ‍ॅड. महेश देशमुख यांनी मांडली. आरोपींच्या वकिलांचा हा युक्तीवाद ग्राह्य धरत विशेष न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा