Breaking

मधमाश्यांपासून सावधान; स्वतः ची आणि मधमाश्यांचीही काळजी घ्या : वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे


जुन्नर / हितेंद्र गांधी : जुन्नर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत मधमाश्यांच्या हल्ल्याच्या सुमारे १० घटना घडल्या आहेत. किल्ले शिवनेरीसह इतर विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यात सुमारे २०० नागरिकांना माश्यांनी दंश केला होता. या पार्श्वभूमीवर शिवजयंतीला गडावर येणाऱ्या शिवभक्तांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे. 


ते म्हणाले की गडावर येणाऱ्या नागरिकांनी सुगंधी अत्तर, सेंट, दारू, सिगारेट आदींचा अजिबात वापर करू नये. तसेच मधमाश्यांच्या परिसरात गोंगाट किंवा मोठ्या आवाजात गाणी लावू नये. माश्या कॅमेराच्या फ्लॅशमूळेही विचलित होत असून नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ दुपट्टा, शाल किंवा प्लॅस्टिक सदृश्य पिशवी सोबत ठेवावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. सध्या वातावरणातील उष्णता वाढल्याने माश्या विचलित होण्याची दाट शक्यता असते. 

मागील आठवड्यात गडावर झालेल्या हल्लेप्रसंगी लहान मुलांनी पोळ्यांना दगड मारल्याची चर्चा होती. नागरिकांनी जास्तीत जास्त शरीर झाकले जाईल, असा पोशाख परिधान करावा आणि लहान मुलांची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा