Breaking

मोठी बातमी : सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाईही वाढणार !


नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. युक्रेन - रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.


पंजाब, उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याची शक्यता आता खरी ठरली आहे. तसेच आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

किरकोळ बाजारात आज (दि.२३) सकाळपासून पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैसे प्रति लिटरने वाढ होणार आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा