Breaking

मोठी बातमी : राज्यातील "या" जिल्ह्यांना पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा


पुणे : राज्यात सध्या उन्हाचा तडाखा पहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेनं शरिराची लाही लाही होत आहे. उन्हानं आता सर्वांच्या अडचणीत भर टाकायला सुरूवात केली आहे. सर्वत्र सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.


पूढील चार ते पाच दिवसात उत्तर - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या वाटेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.


मध्य महाराष्ट्रात २९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत अहमदनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तविण्यात आला आहे.

राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्या पुढ पारा गेला आहे. येत्या काही दिवस तरी उष्णतेत अशीच झपाट्यानं वाढ होणार आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा