आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ......
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा
सर्वात मोठी बातमी : महाराष्ट्र निर्बंधमुक्त
मुंबई : राज्यातील जनतेसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे . राज्यात कोरोना महामारी नंतर अनेक निर्बंध घातले होते. ते निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यात आपत्ती व्यवस्थापन, तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावलेले निर्बंध गुढीपाडवा पासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घोषित केले.
भविष्यात कोरोनाचा धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, करोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्विट करत म्हटले की, "आज मंत्रीमंडळात करोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा."
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा