पुणे : कात्रज येथील गंधर्व लॉन्सजवळ सुंदा माता मंदिराच्या परिसरात १८ ते २० सिलेंडरचे स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या सिलेंड़रच्या स्फोटानं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
पुणे : कात्रज येथील गंधर्व लॉन्सजवळ १८ ते २० सिलेंडरचे स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या सिलेंड़रच्या स्फोटानं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.#pune pic.twitter.com/OM37lJcL5C
— MaharashtrajanbhumiNews (@MaharashtrajanB) March 29, 2022
मुंबई- बंगलोर हायवे जवळ कात्रजमधील गंधर्व लॉ़न्स परिसरात सायंकाळी 5 वाजता अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर नागरीकांना काही कळण्याच्या आताच सुमारे 20 सिलेंडरचे स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार अजुनपर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहे.
एका पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे 100 गॅस सिलेंडरचा अनधिकृतपणे साठा करून ठेवलेला होता. नागरिकांच्या सांगण्यानुसार काही दिवसांपासून येथे गॅस सिलेंडरची विक्रीही सुरू होती. सायंकाळी 5 वाजता अचानक 15 ते 20 सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटची तीव्रता इतकी होती की या आगनितांडवात जवळपासच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबतची अद्याप माहिती मिळालेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा