Breaking


पुणे : ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना


पुणे : शिवाजीनगर येथील एका शाळेत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक व धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी) दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील मुलींच्या शाळेत पीडित मुलगी शाळेमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने तिला बोलण्यात फसवून शाळेच्या बाथरूम नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर संबंधित व्यक्तीने त्या मुलीस या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला बघतो, अशी धमकी दिली.


मात्र घडल्या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध 376 आणि पोक्सो (POCSO) कायद्यानुसार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा