Breaking


“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून पटोले यांची टीका


मुंबई : गेल्या सात दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. तसे संकेत वर्तवले ही जात होते. ते अंदाज आता खरे ठरताना दिसत आहे.


इंधन दरवाढीच्या किंमतीवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर ट्वीटरवरून टीका केली आहे. पटोले यांनी ट्वीट केले आहे कि, कच्च्या तेलाच्या किंमतीत २६ टक्क्यांनी घट, तरीही आज पेट्रोलच्या दरात ८० पैशांची, तर डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ; आठवड्याभरात इंधनात ४.८० रुपयांची दरवाढ ! वारे रे पाकिटमार मोदी सरकार!!


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


पटोले यांनी 28 मार्च रोजी देखील ट्वीट करून म्हटले होते कि, आज पुन्हा पेट्रोल ३० पैसे, तर डिझेल ३५ पैशांनी वाढले. गेल्या ७ दिवसात इंधनाचे दर ४ रूपयांनी वाढले. निवडणूक असती तर मोदी सरकारने अशी दरवाढ होऊ दिली नसती. भाजपला केवळ सत्ता हवी आहे. जनतेशी देणेघेणे नाही, अशी टीका त्यांनी केली होती.


दरम्यान, मुंबईत 19 मार्च 2022 रोजी पेट्रोलच्या किंमती 109.96 तर डिझेल 94.14 होत्या, त्या आज 29 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे हे दर अनुक्रमे 114.17 तर 98.48 झाले आहे.


देशव्यापी संपानिमित्त पुण्यात कामगारांचे जोरदार आंदोलन, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा