Breaking

शहीद दत्ता पाडाळे पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी


पिंपरी चिंचवड : आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठल वाडी परिसरात गेली दोन वर्षे रस्त्याची कामे सुरू आहेत. मयूर कॉलनी येथील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. तसेच गंगानगर येथील रस्ते प्रलंबित आहेत, अशी प्रलंबित सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने आकुर्डी क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.


तसेच शहीद दत्ता पाडाळे यांच्या पुतळ्याची दुर्दशा झालेली आहे. त्या ठिकाणी दररोज स्वच्छता होत नाही. 1979 मध्ये बजाज कामगारांच्या आंदोलनात गोळीबारात बळी पडलेल्या या पुतळ्याचे सुशोभीकरण प्रशासनाने त्वरित करावे. 

तसेच पावसाळ्यात आकुर्डी गावात ओढ्याला मोठा पूर येतो, त्यासाठी ओढे आणि नाले यांची स्वछता करावी. आकुर्डी येथील मल्हारराव कुटे हॉस्पिटल समोर पडणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे, अशा मागण्याचे निवेदन आप'चे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा