Breaking

सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांची वडवणी तहसील कार्यालयावर निदर्शने


कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा - कॉ. डॉ.अशोक थोरात.


वडवणी : कामगार संघटनांनी पुकारलेल्या दि. २८- २९ दोन दिवसीय देशव्यापी संपामध्ये सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार कामगारांनी सहभाग घेतला. यावेळी कामगारांनी वडवणी तहसील कार्यालय येथे जोरदार निदर्शन आंदोलन करत केंद्र सरकारकडे नवीन चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी केली. या मागण्याचे निवेदन तहसिलदार यांच्या मार्फत पंतप्रधान यांना पाठवण्यात आले.


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ
आंदोलनात प्रामुख्याने शालेय पोषण आहार कामगारांना नियुक्तीपत्र द्या, नफ्यात चालणाऱ्या सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण बंद करा. आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी (योजना कर्मचारी) यांना किमान वेतन २६ हजार रुपये दरमहा करा. कोविड मध्ये काम केलेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कायम करावे, ६० वर्षावरील बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये महिना वेतन द्या, सरकारी पेन्शन न मिळणाऱ्या ६० वर्षांवरील व्यक्तींना १०,००० रू. महिना द्या, कायमस्वरूपी कामाचे कंत्राटीकरण करू नका. आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व सिटू कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अशोक थोरात यांनी केले. 


यावेळी अंजू सावंत, विद्या सोळंके, पार्वती बेले, वच्छला घाटूळ, नंदिनी देशमुख आदी कामगार महिला यांच्यासह एसएफआयचे जोतीराम कलेढोन, गणेश मुंडे, राजाभाऊ देशमुख, शेख आयुब शेख लाला, राजेभाऊ बादाडे, संदीप शिंदे, गितेश आगे आदी आंदोलनात सहभागी होते. त्यावेळी किसान सभेच्या वतीने कॉ.जगदीश फरताडे यांनी पाठिंबा दिला. तसेच माकपच्या वतीने कॉ.लहू खारगे यांनी पाठिंबा दिला.


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात


दरवर्षी तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची “यांनी" केली घोषणा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा