Breaking

व्हिडिओ : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराची संंसदेत मागणी


नवी दिल्ली : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. फौजिया खान यांची संंसदेत मागणी केली आहे.

 

डॉ. खान म्हणाल्या, "आरक्षण हा 'गरिबी हटाव कार्यक्रम' नसून पुरेशा प्रतिनिधित्वाच्या संधींचे संविधानिक साधन आहे. महाराष्ट्र शासनाच्या १९६७ च्या नियमानुसार धनगर समाजाचा इतर मागासवर्गीय जातींमध्ये समावेश करण्यात आला होता. सद्यस्थितीत त्यांचा समावेश हा भटक्या जमातींमध्ये आहे."


महाराष्ट्र राज्यात धनगर व तत्सम जमातींसाठी ३.५% इतके आरक्षण सध्या देण्यात येत आहे. 'अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारणा कायदा -१९७६' अन्वये जाहीर करण्यात आलेल्या यादीत धनगर जमातीचा उल्लेख आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यघटनेच्या कलम ३४५(१) अनुसार अनुसूचित जमातीच्या यादीत एखाद्या जमातीचा समावेश करणे वा वगळण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा आणि त्याद्वारे त्यांना सामाजिक व आर्थिक आरक्षण लागू करण्यात यावं, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा