गेल्या तीन वर्षाची शिष्यवृत्ती तात्काळ वाटप करा - एसएफआय
सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) सोलापूर जिल्हा कमिटी च्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तीन वर्षांच्या शिष्यवृत्ती च्या संदर्भात समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षाच्या शिष्यवृत्ती तत्काळ देण्याची कार्यवाही करावी, तसेच महाविद्यालयाकडून होणाऱ्या चुका आणि शिष्यवृत्ती संदर्भातील त्रुटी सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच काही विद्यार्थ्यांकडून त्रुटी असतील तर त्या - त्या महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना कळवावे. आणि तात्काळ सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती त्यांच्या अकाउंट ला जमा करावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी व विद्यार्थी उपस्थित होते.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा