Breaking

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एसएफआय कडून ई-मेल करो आंदोलन


सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - (SFI) सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये गेल्या 17 मार्च पासून हिवाळी 21-22 संपूर्ण सेमिस्टर बॅक व महाविद्यालयातील स्थानिक विविध मागण्यांना घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु आहे.आज राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि एम.एस.बी.टी.ई पुणे, मुंबई विभागाला ई-मेल करो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. 


यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जि.क.सदस्य प्रभुदेव भंडारे, प्रसन्न शिवणकर, गणेश लोखंडे, कृष्णा उगळे, सागर धर्मसाले, नितीन कमळे, रोहित खुने, रिहान सय्यद, सुहास झिझुरटे, शैलेश लोकरे, विश्वजीत क्षीरसागर आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा