निवडणुका संपल्या, इंधन गॅस दरवाढीचा दणका
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यानी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे, पाच राज्याच्या निवडणूकीनंतर सरकारने इंधन आणि सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी 6 ऑक्टोबर 2021 मध्ये सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. तसेच व्यावसायिक सिलेंडरचे दरही वाढविले होते. तेव्हा घरगुती गॅस मात्र वाढविला नाही. आता मात्र घरगुती सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढविली आहे.
14.2 किलोचा विनाअनुदानित सिलिंडर आता 949.50 रुपयांना मिळणार आहे. 5 किलोचा एलपीजी सिलिंडर 349 रुपयांना, 10 किलोचा 669 रुपयांना आणि 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2003.50 रुपयांना मिळणार आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी घाऊक डिझेल विक्रीचा दर प्रति लिटर 28 रुपयांनी केला आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलची किंमत 115 रुपये प्रति लिटर झाली आहे. येत्या काही दिवसात पेट्रोल, सीएनजीची दरवाढ होऊन महागाई पुन्हा तीव्र होणार आहे.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा