मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीच्या अपघाताची घटना घडली आहे. कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट जवळ सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एकमेकांना आदळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक ब्रेक लावल्यामुळे या गाड्यांची टक्कर झाली त्यावेळी हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित असून गाड्यांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मालवण येथील रॅलीला आदित्य ठाकरे संबोधित करणार आहेत. येथून आदित्य ठाकरे यांनी आपला तीन दिवसाचा कोकण दौरा करतील.
मोठी बातमी : राज्यातील "या" जिल्ह्यांना पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पासंदर्भात वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेऊ, असं सांगितलं आहे.
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा