Breaking

रंग खेळून अंघोळ करायला गेलेल्या जोडप्याचा मृत्यू, होळीच्या दिवशी कुटुंबावर शोक

 

कर्नाल, 19 मार्च : बाथरूमच्या गिझरमुळे अनेक अपघात झाले आहेत. अशाच एका अपघाताची बातमी कर्नालमधून समोर आली आहे. इथे एका कुटुंबाचा होळीचा आनंद शोकात बदलला. 


मिळालेल्या माहितीनुसार, घारौंडा येथील मिठाई दुकान मालकाचा मुलगा आणि सुन होळी खेळल्यानंतर आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलं होतं. त्यानंतर बराच वेळ ते बाहेर न आल्यानं तपासणी केली असता दोघेही तिथे मृतावस्थेत पडलेले दिसले.


आम्ही कोणाकडून तेल घ्यावे हे तुम्ही सांगू नका - भारताचा कडक इशारा


27 वर्षीय गौरव आपली पत्नी शिल्पी हिच्यासोबत होळी साजरी करून घरी परतला होता. होळीमुळे लावण्यात आलेला रंग काढण्यासाठी दोघंही अंघोळ करायला बाथरूममध्ये गेले. यादरम्यान बाथरूममधील गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्याने दोघेही तिथेच बेशुद्ध झाले. बाथरुममध्ये गौरव आणि शिल्पीसोबत घडलेल्या घटनेची कुटुंबीयांना कल्पनाही आली नाही.


सुमारे 2 तासानंतर गौरवच्या कुटुंबीयांनी बाथरूम उघडून पाहिलं असता त्यांना धक्काच बसला. पती-पत्नीला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर कुटुंबीयांच्या आनंदावर शोककळा पसरली.

मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडणार? किरीट सोमय्या यांच्या ट्वीटमुळे खळबळ


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. स्टेशन प्रभारी दीपक जांगरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथरूममध्ये घडलेल्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा