Breaking

चाहत्यांची प्रतीक्षा संपली : “KGF 2” चा ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Photo : @KGFTheFilm


मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा KGF: Chapter 1 या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी याआधीच त्याचे अनेक पोस्टर्स रिलीज केले. आता KGF: Chapter 2 चा ट्रेलर देखील रिलीज झाल्याने चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.


निर्मात्यांनी रविवारी एका लाँच इव्हेंटमध्ये कन्नड भाषेत संध्याकाळी ६.४० वाजता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज केला. यानंतर चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि नंतर इतर भाषांमध्येही लाँच करण्यात आला. हा चित्रपट यावर्षी 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरही उपस्थित होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये साऊथचा अभिनेता यशचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. यासोबतच बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त देखील ट्रेलरमध्ये फुल फॉर्ममध्ये दिसले. KGF च्या पहिल्या भागाप्रमाणेच KGF 2 देखील हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. 


IPL मोफत बघायचे आहे? जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने आणले सर्वात स्वस्त प्लॅनकन्नड भाषेत बनलेल्या KGF 1 या चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर प्रेक्षाकांना दुसर्या भागाची उत्सुकता लागली होती. कोरोनामुळे चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 14 एप्रिलला चाहत्यांना पाहता येणार आहे, त्यामुळे चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.


12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल ची दरवाढ सुरुच, आठवड्यात सहाव्यांदा वाढ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा