Breaking

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्यांना एसएफआय कडून घेराव


सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. हुनसिमरद यांना घेराव घालण्यात आला.


सविस्तर वृत्त असे की, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे हिवाळी 2021-22 सेमिस्टर परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांना एम.एस.बी.टी.ई ने संपूर्ण सेमिस्टर बॅक ठेवण्यात आले. असून त्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने विद्यार्थ्याना घेऊन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना घेराव घालून या सेमिस्टर बॅक निकालासंदर्भात जाब विचारण्यात आला. कोणत्या आधारावर कॉपी केस विद्यार्थ्यांवर करण्यात आले, कॉपी केस झाल्यावर त्यासंदर्भात समिती नेमली होती का? एम.एस.बी.टी.ई चे समिती महाविद्यालयात येऊन चौकशी केली आहे का? नेमले असेल त्या समिती मध्ये कोणकोण शिक्षक होते. फक्त काही विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे निकाल का घेण्यात आले. असे अनेक प्रश्न प्राचार्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारले आहेत.


याबाबत बोलताना जिल्हा सचिव मलेशम कारमपुरी म्हणाले की, "या सर्व प्रकरणाची चौकशी एम.एस.बी.टी.ई चे समिती महाविद्यालयात आलेली नाही. या ठिकाणी थी समिती करण्यात आली आहे, यामध्ये समिती मुख्य प्राचार्य होते. आणि आम्ही त्यांना हे सुद्धा विचारण्यात आले. आपल्या समिती मार्फत चौकशी केलेली अहवालाची एक प्रत द्या. आम्हालाही पाहु द्या तुम्ही कशी चौकशी केली ती पण प्राचार्य समितीचा रिपोर्ट द्यायला तयार नाही. यावरून कळतं की प्राचार्य आणि त्यांचे प्राध्यापक वर्ग यांचे सुढबुद्धीचे राजकारण आहे."

एसएफआय संघटनेच्या वतीने एम.एस.बी.टी.ई ने सर्व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन फेर निकाल देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे मागणी मान्य न झाल्यास महाविद्यालयात रोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. गरज पडली महाविद्यालय बंद करून आंदोलन केला जाईल, यामध्ये विद्यार्थ्यांच्या नुकसानीस सर्वस्वी महाविद्यालय, एम.एस.बी.टी.ई आणि प्रशासन जबाबदार राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला.


यावेळी एसएफआयचे जिल्हाअध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, जिल्हा सहसचिव श्यामसुंदर आडम, जिल्हा कमिटी सदस्य दत्ता हजारे, प्रसन्न शिवणकर, गणेश लोखंडे, साक्षी रोंगे, शीतल प्रक्षाळे, कृष्णा उगले, आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा