Breaking

आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !


आपण सर्वच सध्या अत्यंत कडाक्याच्या, उन्हाच्या झळा सोसत अहोत. याचे आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहेत. आपला भाग हा शेतीप्रधान असल्याने, व या काळात शेतीची अनेक कामे चालु असल्याने लोक उन्हाने त्रस्त होत आहेत, अती उन्हाने शरीरातील क्षारयुक्त पाणी घामाद्वारे जाऊन किंवा त्वचेवर उन्हाच्या तीव्र आघाताने उष्माघाताची सौम्य ते तीव्र लक्षणे सध्या दिसत आहेत.


सौम्य लक्षणे : थंडी, ताप, अशक्तपणा, अंगदुखी, उलटी, जुलाब इ.

तीव्र लक्षणे : उन्हाळी लागणे, चक्कर, भोवळ इ.


कोणती काळजी घ्यावी ?

१. शक्यतो सर्व कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावेत.

२. उन्हामध्ये फिरणे, प्रवास करणे टाळावे ( लग्न कार्य इ. )

३. उन्हातून आल्यावर एकदम खूप गार पाणी पिणे किंवा डोक्यावर ओतणे टाळावे.

४. अति थंड, फ्रिज मधील एकदम थंड पाणी, कोल्ड्रिंक्स इत्यादी पिणे टाळावे, त्या ऐवजी साधे पाणी, ताक, लिंबू सरबत प्यावे.

५. सतत खूप वेळ उन्हात काम करू नये.

६. काम असेलच तर सावलीतील, आडोश्याची कामे करावीत.

७. सतत, थोडे थोडे योग्य प्रमाणात पाणी पीत राहावे


८. लिंबू सरबत, नारळ पाणी, ताक, कलिंगड, तसेच ज्यूस यांचे सेवन करावे.

९. तीखट, तळलेले पदार्थ इत्यादींचे सेवन टाळावे.

१०. जड व्यायाम करणे टाळावे ‌‌.

११. चंदन, वाळा आदींचा लेप अंगावर करावा, वाळा पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात ठेवावा.

आरोग्य सल्ला : डॉ. दयानंद गायकवाड,
गायकवाड क्लिनिक, महाबरे कॉम्प्लेक्स, नवीन ST स्टँड जवळ, जुन्नर 
संपर्क : 9922855174


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा