Breaking

महागाईचा भडका, पेट्रोल डिझेल दरात आठवड्यात चौथ्यांदा वाढ


नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल च्या दरात आठवड्यात सलग चौथ्यांदा वाढ आहे. पेट्रोल 84 तर डिझेल 85 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ झाली आहे. 


तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 84 पैसे आणि 85 पैशांनी वाढले. तर दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले.


पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. तसे संकेत वर्तवले ही जात होते. ते अंदाज खरे ठरले आहेत. 

जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा