Breaking

अशासकीय अनुदानित कला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना “हे” लाभ देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत


मुंबई : अनुदानित कला संस्था कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली 31 अशासकीय कला संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना ७ व्या वेतन आयोगानुसार ‘हे’ भत्ते मिळणार


शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना, अध्यापकीय पदांना द्विस्तरीय / त्रिस्तरीय वेतन संरचना, अध्यापकांनी विनाअनुदानीत कला संस्थेमध्ये केलेली सेवा उच्च वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाच्या तरतुदी, शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांपर्यंत प्रसुती रजा, “कॅन्सर” “पक्षाघात” झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजाविषयक तरतुदी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती यासंदर्भातील तरतुदी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत हे लाभ देण्याचा निर्णय झाला आहे.


इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) मध्ये पदांसाठी भरती!


व्हिडिओ : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराची संंसदेत मागणी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा