Breaking

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता - यशोमती ठाकूर यांची माहिती


पुणे : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना खुशखबर असून राज्य सरकारने प्रोत्साहन भत्ता लवकरच थेट खात्यात जमा करणार असल्याचे सांगण्यात आले.


सविस्तर वृत्त असे की, पोषण ट्रॅकरचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात लवकरच जमा केला जाईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

पोषण ट्रॅकरचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्त्यासाठी ५१ कोटींच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा