Breaking

पुणे-पिंपरी चिंचवड मध्ये 28, 29 मार्च रोजी औद्योगिक संप


कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी बंद मध्ये सहभागी व्हा - डॉ.कैलास कदम


महाविकास आघाडी सरकारने नव्या कामगार कायद्याची अंमलबजावणी करू नये - डॉ.अजित अभ्यंकर

पिंपरी चिंचवड : पुणे, पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांच्या कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशव्यापी औद्योगिक बंदला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे,प्रमुख कामगार नेत्यानी शहर परिसरात चौक सभा,मिरवणुका द्वारे प्रचार मोहीम सुरू केली आहे.

कामगार नेते आणि कृती समितीचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने प्रचलित कामगार कायदे रद्द करुन चार नव्या कामगार कायद्यांना मंजूरी दिली आहे. देशभर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु असताना संसदेमध्ये कोणतीही चर्चा न करता कोट्यावधी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करुन भाजपाने हे कायदे मंजूर केले. 
या नविन कामगार कायद्यांना देशभरातील सर्व कामगार संघटनांचा तीव्र विरोध आहे. हे कायदे रद्द व्हावेत तसेच कामगारांच्या इतर मागण्यांसाठी सोमवारी व मंगळवारी (दि. २८ व २९ मार्च) देशभर राष्ट्रीय अखिल भारतीय औद्योगिक संप व धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामध्ये सर्व कामगार बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समिती पुणेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

सिटूचे नेते डॉ. अजित अभ्यंकर म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या औद्योगिक संबंध कायदा ; सुरक्षा, आरोग्य, अपघात, कार्यस्थळ, परिस्थितीबाबतचा कायदा, वेतन विषय कायदा, सामाजिक सुरक्षा कायदा या काळ्या कायद्यांमुळे सर्व क्षेत्रातील कामगार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्राप्रमाणेच सरकारी बँका, विमा, संरक्षण, बीएसएनएल, रेल्वे, अन्य महामंडळे, शासकीय संस्था, प्रशासकीय खाती यांची मालमत्ता कच-याच्या भावाने उद्योगपतींच्या घशात घालण्याची नवी योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. ही क्षेत्रे खासगी उद्योगपतींच्या दावणीला बांधून देशाचे हितसंबंधच धोक्यात आणले आहेत. 

या कायद्यांमुळे औद्योगिकीकरणाचा वेग अतिशय कमी होणार असून देशात प्रचंड वेगाने बेरोजगारी वाढणार आहे. यासाठी प्रचलित सर्व कामगार कायद्यांची विनाअट व विनाअपवाद तात्काळ अंमलबजावणी व्हावी. या मागणीसाठी दोन दिवसांचा अखिल भारतीय संप पुकारला आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. अभ्यंकर यांनी केले.

मानव कांबळे (नागरी हक्क सुरक्षा समिती) म्हणाले की, नव्या कामगार कायद्यामुळे सर्व क्षेत्रात अनिर्बंध खाजगीकरण धोरण राबवले जाईल, त्याची सुरवात झाली आहे. एल.आय.सी. सहित सर्व विमा क्षेत्र,संरक्षण, आरोग्य,बी. एस् .एन् .एल् . शिक्षण, बँका, संरक्षण, पोस्ट, रेल्वे इत्यादी केंद्र व राज्य सरकारांच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील सेवा आणि विभागांचे खाजगीकरण करण्याचे धोरण आणि तशा प्रकारच्या योजना सरकार राबविण्यात यशस्वी होईल. सर्व क्षेत्रात कंत्राटीकरण वाढणार आहे, त्यामुळे सरकारने नवे कायदे रद्द केले पाहिजेत.

या संपात सहभागी होण्यासाठी सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत, खासगी, सरकारी, निम सरकारी, घरेलू कामगारांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय (कौन्सिल हॉल) येथे धरणे आंदोलनात भाग घ्यावा असेही आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

28, 29 मार्च 2022 रोजी खालील कामगार संघटनांचे नेते, कार्यकर्ते या बंद आणि मोर्च्या मध्ये सामील होणार आहेत.


यामध्ये हमालपंचायतचे बाबा आढाव, इंटक चे डॉ.कैलास  कदम, सिटूचे कॉम्रेड, अजित अभ्यंकर, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, गोरख मेंगडे - हमाल पंचायत , किशोर ढोकले (राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ), तान्हाजी खराडे ( आयटक) नितिन पवार - अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, मानव कांबळे - अपना वतन संघटना, मारुती भापकर, अरुण बोराडे - रा.का.सेल, इरफान सय्यद  - भा.का.सेना, किरण मोघे - घरकामगार संघटना, बबन झिंजुर्डे - पिं.चिं.मनपा क.महासंघ, शुभा शमीम - अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र, रघुनाथ कुचिक ( भा.का.सेना)  यशवंत सुपेकर - हिंद कामगार संघटना, लता भिसे - भा.क.प, अनिल रोहम - आयटक मनोहर गडेकर - इंटक, वसंत पवार (सीटू), शशिकांत धुमाळ - संरक्षण, चंद्रकांत तिवारी - विमा का.संघटना, दगडू लांघी - बेफी, शैलेश टिळेकर - ए.आय.बी.ए. , 


युसुफ जकाती - BSNL, अरविंद जक्का - आयटक, अरविंद शिवतारे - AIPU, रजनी पिसाळ - अंगणवाडी कर्मचारी युनियन, सुरेखा गाडे - कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत, डि.पी.गायधनी, सचिन चौधर, एस.जी सुळके - आयटक, अनिल औटी -एम एस.ई.बी., हमीद इनामदार - इंटक, मोहन पोटे, शशिकांत महांगरे, विकास बगाडे, विशाल भेलकर, गोरख दोरगे, गणेश दराडे, डॉ.ज्ञानेश्वर मोटे - सीटू., सुनिल देसाई - बँक कर्मचारी संघ, चंद्रकांत कदम , कुमार मारणे  - कात्रज डेरी, धनाजी गावडे - CWPRS, उदय भट - महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ. योगेश कोंढाळकर - संरक्षण विभाग देहूरोड, प्रकाश जाधव - पुणे मनपा कर्मचारी युनियन. शांताराम कदम, सचिन कदम, विट्ठल गुंडाळ, किरण भुजबळ, संतोष पवार, विजय राणे, नवनाथ जगताप, संतोष खेडेकर, मनोज पाल, विलास शिर्के, - हिंद कामगार संघटना आदींसह सहभागी होणार आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा