Breaking

जुन्नर : मातीशी इमान राखून विषमुक्त शेती पिकवा - बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे


नारायणगाव : हायब्रीड आणि रासायनिक शेतीमुळे कुपोषनासहित आरोग्याच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे गावरान वान वापरून सेंद्रिय शेतीवर भर देऊन मातीशी इमान राखा आणि विषमुक्त शेती पिकवा असे आवाहन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केले.


त्या मुक्ताई समाज मंदिर नारायणगाव येथे ग्रामपंचायत नारायणगाव आणि श्री प्रथमेश ज्वेलर्स प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती व जागतिक महिला दिना निमित्त महिला स्नेह मेळाव्यात बोलत होत्या. 
     
    
यावेळी प्रसिध्द अभिनत्री पूनम चांदोरकर, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, श्री प्रथमेश ज्वेलर्सच्या संचालिका स्नेहल जवळेकर, रत्नपारखी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राखी रत्नपारखी, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, माजी उपसरपंच सारिका डेरे, ज्योती दिवटे, मनीषा मेहेत्रे, सुप्रिया खैरे, कुसुम शिरसाट, संगीता खैरे, अश्विनी ताजने, गणेश पाटे, राजेश बाप्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कलापंढरी नारायणगावात येऊन येथील माता-भगिनींसमोर बोलण्याचे मला भाग्य लाभले. नारायणगावातील भव्य ऐतिहासिक प्रवेशद्वार, ग्रामदैवत मुक्ताई मंदिर व सभागृह पाहून गावातील संघटित कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रसिद्ध अभिनेत्री पूनम चांदोरकर यांनी म्हटले. या स्नेह मेळाव्यात महिलांसाठी मंगेश फाकटकर प्रस्तुत 'होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


मानाची पैठणी जिंकण्याचा मान सृष्टी संदीप विश्वासराव यांना मिळाला तर रेखा सुपेकर यांना द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ आणि सायली म्हात्रे यांना तृतीय क्रमांकाचा चांदीचा दिवा बक्षीस म्हणून देण्यात आला. इतर सहभागी महिलांना  विविध बारा बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 'ट्रे' भेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रत्नपारखी फाउंडेशन नारायणगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक सरपंच योगेश पाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.मेहबूब काझी यांनी तर आभार माजी उपसरपंच सारिका डेरे यांनी मानले. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा