Breaking

जुन्नर : लोकभारती पक्षाच्या वतीने बांधकाम कामगारांना साहित्य किट चे वाटप


जुन्नर : लोकभारती पक्ष जुन्नर तालुक्याच्या वतीने आळेफाटा येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने बांधकाम विभाग माध्यमातून बांधकाम मजुरांना मिळणारे साहित्य (कीट) वाटपाचा कार्यक्रम पार पडला. 


किट मिळवून देण्यासाठी मुस्तफा दादामिया सय्यद यांनी अतिशय कठोर परीश्रम घेतले. यावेळी सरफराज चौगुले, आरिफ चौगुले व इतर मजुरांना साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी जुन्नर तालुका अध्यक्ष खालिद पटेल, जुन्नर तालुका महिला कार्याध्यक्षा रिना राजू खरात, जुन्नर तालुका संघटक रफिक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसचे एजाज चौधरी यांनी लोकभारतीत गरिबांना न्याय मिळतो हे पाहून जाहीर प्रवेश केला. त्यांना जुन्नर तालुका कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली.

यावेळी लोकभारती ऑनलाईन सर्विसेस (सेतू ) चे प्रमुख मुस्तफा दादामिया सय्यद, RPI चे जुन्नर तालुका अध्यक्ष गुळवे, सरफराज चौगुले, आरिफ चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा