Breaking

जुन्नर : रोजगार हमी योजना समितीची 4 महिने बैठकच नाही, बैठक घेण्याची गणपत घोडे यांंची मागणी


जुन्नर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समिती ११ डिसेंबर २०२१ रोजी गठीत करण्यात आली आहे. परंतु अद्यापही समितीची एकही बैठक झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


तालुकास्तरीय समितीची बैठक आयोजित करावी अशी मागणी, तालुकास्तरीय रोजगार हमी योजना समितीचे सदस्य गणपत घोडे यांनी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


घोडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील गावांमध्ये रोजगार हमी योजना राबविण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. गावातील मजुरांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करूनही बऱ्याच गावांमध्ये रोजगार उपलब्ध होत नाही, कामाची मागणी करूनही काम दिले नाही, अशा सर्व मजुरांना तात्काळ बेरोजगार भत्ता दयावा, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तातडीने रोजगार हमीची कामे चालू करण्यात यावीत, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मजूर प्रधान किमान पाच कामांचा सेल्फ तयार करण्यात यावा, परंतु बऱ्याच ग्रामपंचायतीन मध्ये सेलफवर कामे घेतली जात नाहीत, ग्रामपंचायत मध्ये नमुना नंबर 4 उपलब्ध नसतो तो उपलब्ध करून देण्यात यावा, नमुना नंबर 5 वर दिनांकित पोच दयावी, मनरेगा योजने अंतर्गत कामे मंजूर करताना बनविण्यात येणारे अंदाजपत्रक त्या त्या विभागाच्या प्रचलित नियमानुसार व डेमो न घेता तयार केली जातात. त्यामुळे मजुरांना कमी प्रमाणात मजुरी मिळते, असल्याचेही गणपत घोडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतानाही अनेक अडचणी असल्याचे खुद्द समितीच्याच सदस्याने लेखी पत्राने कळवले आहे.


तालुक्याचे आमदार अतुल बेनके या समितीचे अध्यक्ष असून ते राज्याच्या रोजगार हमी समितीचे सदस्य आहेत‌ असे असतानाही रोजगार हमीच्या योजनेतून काम मिळण्यासाठी मजूरांना संघर्ष करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

निवेदन देतेवेळी गणपत घोडे, राजू शेळके, दादाभाऊ साबळे, दिपक लाडके, अक्षय घोडे हे उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा