Breaking

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का, माजी पंचायत समिती सदस्याचा पक्षाला रामराम


जुन्नर
 : बेल्हे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या व माजी पंचायत समिती सदस्या वर्षा प्रदिप पिंगट यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्याकडे दिला आहे. याचबरोबर पिंगट यांनी पुढील वाटचालीबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचेही म्हटले आहे. 

पिंगट या जुन्नर तालुक्यातील राजूरी पंचायत समितीच्या सदस्या होत्या. मात्र पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा एक धक्क असून येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हानात्मक ठरणार यात काही शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा