Breaking

जुन्नर : हातचलाखीने महिलेच्या अंगावरील दागिने चोरट्यांकडून लंपास


जुन्नर : ऊसतोड कामगारांना पैसे दान करावयाचे आहेत असे सांगून दोन अज्ञात व्यक्तींनी हातचलाखीने महिलेच्या अंगावरील ६६ हजाराचे दागिने लंपास केले.


ही घटना शिरोली बुद्रुक ता. जुन्नर येथील किराणा दुकानात घडली. दुकानदार महिला कुसुम बाबुराव काळे वय-५८, रा. शिरोली बुद्रुक यांनी याबाबत जुन्नर पोलीसांकडे फिर्याद दिली असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. 


याबाबतची अधिक माहिती अशी की, काळे यांच्या दुकानात दोन अज्ञात व्यक्ती आल्या, त्यांनी ऊसतोड कामगारांना पैसे दान करावयाचे आहेत असे म्हणत ५०० रुपयांच्या नोटा काउंटरवर ठेवल्या. एका छोट्या पिशवीतुन शेंदूर काढून काळे यांच्या हातावर ठेवून असा शेंदूर आहे का ? अशी विचारणा केली. 

यावेळी काळे यांचे भान हरपले. चार-पाच मिनिटानी भानावर आल्या नंतर गळ्यातील सोन्याची माळ व बोटातील अंगठी नसल्याचे त्यांचे लक्षात आले. तो पर्यंत चोरट्यांनी धूम ठोकली होती.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा