Breaking

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट !


नवी दिल्ली : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. केरळ सरकारच्या प्रस्तावित सिल्व्हर लाईन रेल्वे (Silver line rail) कॉरिडॉरच्या मंजूरीसाठी ते पंतप्रधानांना भेटले असल्याची चर्चा आहे.


केरळ सरकारच्या बहुचर्चित प्रस्तावित सिल्व्हर लाईन रेल्वे कॉरिडॉरला विरोधी पक्ष काँग्रेस (Congress) व भाजपा (BJP) कडून विरोध केला जात आहे. परंतु केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार प्रकल्प पुर्णतःकडे नेण्यावर ठाम असून हा जनतेच्या हिताचा प्रकल्प असलेल्यांचे म्हटले आहे. 


तर काँग्रेस ने विरोध दर्शविला असून हा प्रकल्प फक्त कमिशन लाटण्यासाठी चालवलेला असल्याचा आरोप केला आहे. तर हे सर्व आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने धुकवले आहेत.

काय आहे प्रकल्प ? 

NITI आयोगानुसार, सिल्व्हर लाईन रेल्वे कॉरिडॉरला जवळपास 1.24 लाख कोटी रूपये खर्च अपेक्षित असून, 2025 मध्ये प्रकल्प पूर्ण होणार आहे. तर केरळ सरकारने प्रकाशित केलेल्या तपशीलवार प्रकल्प अहवालात असे म्हटले आहे की, यासाठी 63,940 कोटी रुपये खर्च येईल.

हा पूर्ण झाल्यास, तिरुअनंतपुरम ते कासारगोडला जोडणारा 529.45 किमीचा कॉरिडॉर पहायला मिळेल आणि हाय-स्पीड ट्रेन्स हे अंतर सुमारे चार तासांत कापतील.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा