Breaking


किशोर थोरात यांना राष्ट्रीय ग्लोबल आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान


पुणे : विमाननगर येथील रोबर्टशॉ कंट्रोल्स, आंतराष्ट्रीय कंपनीतील अधिकारी किशोर थोरात, मेंटेनन्स मॅनेजर  यांना उत्कृष्ठ सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल 'विजयालक्ष्मी सोशल फाउंडेशन, सांगोला (पंढरपूर)  आणि कै बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगाव यांच्याकडून 'राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव 2022 आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव पुरस्कार दि 27 मार्च 2022 रोजी विद्याधर हॉल, शिवाजी पार्क, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.


या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजिका आणि समाजसेविका डॉ. सुमित्रा दत्तात्रय पाटील आणि उद्योजक दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ विक्रम शिंगाडे, कै बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक हे ही हजर होते.

किशोर थोरात हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव या खेडेगावातील असून नोकरीच्या निमित्ताने सध्या चिंचवड मधील पूर्णानगर येथे स्थायिक आहेत. ते आधार शैक्षणिक संस्था या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी थोर समाजसेविका कै. सिंधुताई सपकाळ, डॉ. प्रकाश आमटे, पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा घेत संस्थेचा नवी पहाट हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सुरू केला. 

या उपक्रमांतर्गत आधार शैक्षणिक संस्थेमार्फत अनेक गरजू,गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व उच्च शिक्षणासाठी विविध उपक्रमातून मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, सायकल, टॅब, गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धेतील व गुणवंत विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शिक्षकांचा, शिक्षणप्रेमींचा शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने पारितोषिक देवून गौरव केलेला आहे. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त पालकांच्या पाल्यांस व परिवारास दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी साजरी करणे, गोरगरीब महिलांना स्वावलंबी होण्यासाठी शिलाई मशीन देणे अशा प्रकारे विविध सामाजिक कार्यात गेल्या १० वर्षांपासून बहुमूल्य असे योगदान दिले आहे. 


समाजकार्याच्या प्रेरणेने थोरात यांनी आपल्या समाजकार्याची धुरा ही कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांना मागील वर्षीही ज्ञानोदाय बहुउद्देशीय संस्था, श्रीरामपूर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाला होता. तर अशा उत्कृष्ठ सामाजिक कार्याची दखल थेट दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल बिझनेस आयकॉन ने घेऊन त्यांना 2022 चा आयकॉन'स ऑफ आशिया' हा अवॉर्डही नुकताच जाहीर केला आहे. हा अवॉर्ड चाळीस देशांमधील समाजसेवकांमधून दिला जाणारा आहे. पुढील महिन्यात 23 एप्रिलला हा अवॉर्ड दिल्ली येथे देण्यात येणार आहे.

अशा प्रकारे सामाजिक कार्य करणारे किशोर थोरात यांना राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव 2022 आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, नागरिक यांच्याकडून कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
 
- क्रांतिकुमार कडुलकर 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा