Breaking

आमदार महेश लांडगे यांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन


मुंबई : पिंपरी - चिंचवड शहरातील महापारेषण कंपनीच्या भोसरी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. 60 हजाराहून अधिक घरगुती आणि साडे सहा हजार लघुउद्योग, व्यापारी, व्यवसायिक, तसेच सेवा उद्योगातील ऑनलाइन सर्व्हिसेस ना सलग आठ तास खंडित वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला होता. औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्यांबाबत गेली दोन वर्षे विविध तक्रारी येत आहेत.


भोसरी विधानसभा मतदान संघाचे आमदार महेश लांडगे यांनी वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना याबाबत निवेदन दिले आहे.

विशेष म्हणजे, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील महापारेषण कंपनीच्या भोसरी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. यामुळे भोसरी व आकुर्डीमधील जवळपास 60 हजार ग्राहकांकडील तसे साडेसहा हजार लघुउद्योगामधील वीज गायब झाली. महावितरण, महापारेषण चे कर्मचारी व्यवस्थापन बेजबाबदार आहे.

भोसरी वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी महावितरणने जो संपर्क क्रमांक दिला आहे. तो सतत व्यस्त व नॉटरिचेबल असतो. महावितरणचे अघिकारी वीज खंडित झाल्यावर उडवा-उडवीचे उत्तर देत असतात. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.


महाविकास आघाडीचा धिक्कार असो. अकार्यक्षम ऊर्जामंत्री यांचा धिक्कार असो. अशा आशयाचा फलक हातात घेवून लांडगे यांनी सरकारचे लक्ष वेधले. तसेच, सभागृहात हा मुद्दा उपस्थित करुन वीज समस्यांमुळे शहरातील उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे लघुउद्योजक, नागरिक हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारने वीज समस्येबाबत ठोस पावले उचलावीत. अन्यथा पिंपरी-चिंचवडमधील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी आंदोलन करून  दिला आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा