Breaking

प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत मोशी येथे महाआरोग्य शिबीर


पिंपरी चिंचवड :  प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत युवा नेते पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षवेधी स्पोर्ट्स फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्षा कविता संदेश आल्हाट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले.


बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे आयोजित केलेल्या शिबिरात 300 नागरिकांची तपासणी करण्यात आली.  पिंपरी चिंचवड  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

या प्रसंगी माजी नगरसेवक वसंत बोराटे, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, माजी सभापती धनंजय भालेकर, रा.कॉ.पार्टी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक कार्यकर्ते नितिनदादा सस्ते, माजी पंचायत समिती सदस्य हरिभाऊ सस्ते, माजी उपसरपंच विलास कामठे, युवा नेते गणेश सस्ते, विजय सस्ते, युवराज पवार, विशाल आहेर, राहुल बनकर, प्रकाश आल्हाट, चिखली वि. का. सोसा.चेअरमन प्रदीप आहेर, माजी सरपंच गणपत आहेर, सा.का.भानुदास बोऱ्हाडे, राजेंद्र ओझरकर, वसंत आल्हाट, अरविंद बनकर, दत्तात्रय जगताप, एड.विशाल जाधव, निलेश जाधव, प्रकाश गव्हाणे, संतोष सस्ते, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषाताई गटकलळ, कविताताई खराडे, संगीताताई आहेर आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी नागरिकांची मोफत रक्तदाब, मधुमेह, नाक, कान, नेत्र, महिला, लहान मुले या बरोबर सांधेदुखी, त्वचेचे आजार याची विशेष तपासणी करून औषधे देण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी रक्तदान करून या शिबिरास चांगला प्रतिसाद दिला.

- क्रांतिकुमार कडुलकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा