Breaking

अबब ! 4.66 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई


मुंबई : डोंगरी येथील एका 33 वर्षीय व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) ने शुक्रवारी एका ड्रग्स (Drugs) विक्री आणि बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 4.66 कोटी मूल्य असलेले 3.110 किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. 

एएनसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे ड्रग्ज दुसऱ्या राज्यातून आणले होते आणि मुंबईत आरोपी त्याची विक्री करत होते. आरोपी आशिकाली पोईसरवाला (वय.33) हा डोंगरी येथील नवरोजी हिल रोड येथील रहिवासी असून तो भाड्याने राहतो. एएनसीच्या आझाद मैदान युनिटचे सीनियर इन्स्पेक्टर राजेंद्र दहिफळे यांना माहितीदाराकडून माहिती मिळाली होती की डोंगरी भागात काही व्यक्ती एमडी ड्रग्ज विकत आहेत. 

ही व्यक्ती भायखळा येथील क्लेअर रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पोईसरवाला याला पकडण्यात आले. 

डीसीपी (DCP) दत्ता नलावडे यांनी सांगितले की, त्याच्याकडे जवळपास 705 ग्रॅम एमडी सापडले. "आमच्या ANC पथकाने त्याच्या डोंगरी निवासस्थानाची झडती घेतली आणि त्याच्या घरी कपाटात लपवून ठेवलेले 2.405 किलो एमडी ड्रग्ज सापडले,".


पोईसरवाला यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 2021 मध्ये, पोईसरवाला याला यापूर्वी एका पाठलाग प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तो जामिनावर बाहेर होता.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा