Breaking

राज्यात पेट्रोल - डिझेल दरवाढ सुरूच


Petrol Diesel Price Hike : साडेचार महिन्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ झाली आहे. मंगळवार सकाळी सहा वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. पंजाब, उत्तरप्रदेश सह पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. 


जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा