Breaking

जुन्नर : आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे शहीद दिन साजरा !


"शहीद भगतसिंग यांचे विचार" यावर विषयावर व्याख्यानाचे आयोजन


जुन्नर : भगतसिंग ते स्वतः पत्रकार, नाटककर, वकील, लेखक व विचारवंत होते. त्यांनी जगभरातील नामवंत लेखकांची पुस्तके वाचली व त्या मधून त्यांनी भारतात शोषण विरहित शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी स्रिया व कामगार यांची सत्ता कशी प्रस्थापित होईल असे स्वतंत्र विचार त्यांनी भारतात मांडले. भगतसिंग हे स्वतः निरईश्वरवादी होते. भगत सिंग एका बाजूला असा विचार मांडत होते की फक्त बंदुका आणि बॉम्ब यांच्या जोरावर क्रांती होणार नाही, क्रांती विचारांवर आधारित करावी लागेल पुढे ते असेही म्हणतात. माणूस मारला तरी त्याचे विचार जिवंत राहतात. भगत सिंह यांना फाशी झाल्याच्या नंतर आपल्याला तसे भारतात दिसले सुद्धा. भगतसिंग यांचे विचार अनेक तरुणांनी आत्मसात केले व स्वतःला भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले असे प्रतिपादन गणपत घोडे यांनी केले.

ते 23 मार्च शहीद दिनानिमित्त आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह जुन्नर येथे शहीद भगतसिंग यांचे विचार या विषयावर बोलत होते. यावेळी SFI राज्य कमिटी सदस्य राजू शेळके, संदीप मरभळ, प्रा.महेश गाडेकर, बाळकृष्ण गवारी, जुन्नर तालुका सचिव प्रवीण गवारी हे मान्यवर उपस्थित होते. , आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह व  SFI जुन्नर तालुका समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


पुढे बोलताना घोडे म्हणाले, भगतसिंग यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अगदी बालपणापासूनच आपल्या चुलते व आई वडील यांच्या कडून प्रेरणा घेतली होती. भगतसिंग यांनी 1928 मध्ये भारतीय पत्रकारितेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे लिखाण करून ठेवले आहे. त्यामध्ये ते असे म्हणतात भारतीय पत्रकारितेचा स्तर इतक्या खालच्या पातळीवर गेला आहे की हे लोक भारतात हिंदू-मुसलमान दंगे भडकविण्यात व्यग्र आहेत. असे भगत सिंग 1928 साली लिहितात आजच्या भारतीय पत्रकारिते बद्दल आपण विचार करू शकता.

1926 च्या नवजवान भारत सभेच्या अधिवेशनात भगतसिंग यांनी भारतीय तरुणांना उद्देशून असे म्हटले होते की पिंपळाचे फांदी तुटली तर हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. भारतात मनुष्या पेक्षा आवारा पशूला जास्त महत्त्व दिलं जातं. भगतसिंग सिंग यांनी धर्मा व पत्रकारिता यांवर अत्यंत महत्त्वाचे विचार मांडलेले आपल्याला वाचायला मिळतात. भगतसिंग यांच्याकडून आपण कोणता आदर्श घ्याल आजच्या पिढीने भगतसिंग यांच्या कडून जर आदर्श घ्यावयाचा ठरल्यास तो अभ्यास व संघर्षाचा घ्यावा कारण भगत सिंह एक स्वतः विचारवंत व संघर्षशील क्रांतिकारक होते, असेही घोडे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा