Breaking

बार्शीत आयटक कामगार केंद्राच्या वतीने शहीद दिन साजरा !


बार्शी : आयटक (AITUC)  कामगार केंद्र बार्शी च्या वतीने 23 मार्च 2022 वार बुधवार रोजी सायंकाळी भगवंत मैदानावरील ऑफिसमध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू शहीद दिन साजरा करण्यात आला.  यावेळी शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. 


यावेळ भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव व किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड नामदेव गावडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बालचित्रपट कस्तुरी चे राष्ट्रीय पुरस्कार विजेते विनोद कांबळे व आकाश बनसोडे या तरुणांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी भगतसिंग चरित्र व विचार या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रा. डॉ. रविकांत शिंदे म्हणाले "भगतसिंगाचे कुटुंब हे क्रांतिकारी, रूढी-परंपरा विरोधी होते, भगतसिंग हे धर्म बाजूला ठेवणारे, जबरदस्त वाचन, भाषा अभ्यासक, पत्रकार क्रांतिकारक व तत्वज्ञानी लेखक होते, त्यांनी मार्क्सवादी विचारांचा अभ्यास केला होता त्यामुळे भगतसिंग हे क्रांतिकारी विवेकवादी विचारवंत म्हणून समोर येतात त्याचप्रमाणे राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांचे विचारमंथन होणे आवश्यक आहे."

प्रा. हेमंत शिंदे म्हणाले "भगतसिंग हे जसे तरुण तडफदार क्रांतिकारक होते तसे असते विचारवंत नास्तिक देखील होते क्रांतीचा मार्गदर्शक नेता म्हणून ते तरुणांपुढे आज उभे आहेत."


अध्यक्षीय समारोपात कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले आजच्या परिस्थितीत शहीददिन का साजरा करायचा? या प्रश्ना पासून विचार व्हायला हवा. महागाई, बेरोजगारी, कामगार विरोधी चार लेबर कोड यांना आजही भगतसिंगाचे विचार भिडतात, भगतसिंगाचा आदर्श कर्तारसिंग सारबा होता, तरुणांनी असे आदर्श पुढे ठेवून काम करावे."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड शौकत शेख, सूत्रसंचालन कॉ. डॉ. प्रविण मस्तुद यांनी केले. यावेळी कॉम्रेड लहु आगलावे, भारत भोसले, धनाजी पवार, आनंद काशिद, नागजी सोनवने, बालाजी शितोळे आदी उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा