Breaking

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न, नवनिर्वाचित राज्य सचिव आणि कमिटी जाहीर !


नागपूर : नागपूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २३ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दि. २० ते २२ जानेवारी २०२१ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये राज्यभरातून ३३५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या अधिवेशनात डॉ. उदय नारकर यांची राज्य महासचिव पदी एकमताने निवड करण्यात आली.


अधिवेशनाच्या जाहीर सभेस माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार सिताराम येच्युरी यांनी संबोधित केले, तर खुल्या सत्राचे स्वागताध्यक्ष शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया होते. तसेच माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू, राज्य सचिव नरसय्या आडम मास्तर, शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते डॉ. अशोक ढवळे, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी संबोधित केले.


नवनिर्वाचित राज्य कमिटी सदस्य पुढीलप्रमाणे : 

डॉ. उदय नारकर, (राज्य सचिव) जे.पी. गावित, किसन गुजर, अॅड.एम.एच.शेख, डॉ.एस.के. रेगे, प्रा. ताप्ती मुखोपाध्याय, सुनिल मालुसरे, बारक्या मांगात, सुभाष चौधरी, यशवंत झाडे, पी.एस.घाडगे, विजय गाभणे, डॉ.अजित नवले, नत्थु साळवे, डॉ. विवेक माँटेरो, शैलेंद्र कांबळे, सोन्या गिल, अॅड आरमायटी इराणी, प्रिती शेखर, विनोद निकोले, किरण गहला, लक्ष्मण डोंबरे, रडका कलांगडा, लहानी दौडा, इरफान शेख, सिताराम ठोंबरे, विजय पाटील, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, अजित अभ्यंकर, शुभा शमीम, प्रा.सुभाष जाधव, प्रा.ए.बी.पाटील, उमेश देशमुख, माणिक अवघडे, सुभाष पांडे, अनिल गायकवाड़, भगवान भोजने, मारोती खंदारे, शंकर सिडाम, बालाजी कलेटवाड, डॉ.डी.एल.कराड, भिका राठोड, इंद्रजित गावित, भरत वळंबा, प्राची हातिवलेकर, युसुफ शेख मेजर, अरुण लाटकर, अॅड अजय बुरांडे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा