Breaking

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर AITUC चा मोर्चा


परभणी : येथील जिल्हाधिकारी कचेरीवर आयटक (AITUC) संलग्न कामगार संघटनेच्या वतीने शनिवार बाजार मैदानापासून परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर दि २८ मार्च सोमवार रोजी सकाळी ११.३० वाजता मोर्चा काढण्यात आला होता.


नवे कामगार कायदे रद्द करावेत, कार्पोरेट हिताचे धोरण राबवून देशात सर्वत्र खाजगीकरण, कंत्राटीकरण करण्यासाठी कामगार हिताचा बळी दिला जात आहे, असा आरोप कामगार नेत्या ऍड.माधुरी क्षीरसागर यांनी केला आहे. 

राष्ट्रव्यापी कामगार संघटना संयुक्त कृतीच्या औद्योगिक बंदला पाठिंबा देण्यासाठी आयटक, मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन (लालबावटा),आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, परभणी व हिंगोली जिल्हा गटसचिव कर्मचारी संघटना, फेरीवाला व छोटे व्यावसायिक संघटना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन AIBEA, MSEB वर्कर्स फेडेरेशन या संघटनाचे हजारो सदस्य यावेळी मोर्च्यात सहभागी झाले होते.

मोर्चा व संपाच्या यशस्वीतेसाठी हमाल युनियनचे काॅ.राजन क्षीरसागर, काॅ.शेख अब्दुल शेख मोहम्मद, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्या काॅ. माधुरी क्षीरसागर, काॅ. ज्योती कुलकर्णी, काॅ. अर्चना फड, काॅ. सीमा देशमुख, काॅ. सुनिता धनले, काॅ अर्चना कुलकर्णी, आशा कर्मचारी युनियनचे काॅ मुगाजी बूरूड, शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे काॅ. संगिता जाधव काॅ. लक्ष्मण राठोड, काॅ. सासनिक, काॅ आडे, गटसचिव संघटनेचे काॅ. समिंद्रे, काॅ नवनाथ कोल्हे, एम. ए. सी. बी. वर्कर्स फेडरेशनचे काॅ चाकोते, काॅ. पतंगे, काॅ किशोर गायकवाड, बँक युनियनचे काॅ. सरोदे व अन्य कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा