Breaking


पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन


इचलकरंजी : पेट्रोल (petrol), डिझेल (diesel) व गॅस (Gas) दरवाढी (Price hike) विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (CPIM) इचलकरंजी शहरातील कॉम्रेड मलाबादे चौकात केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.


यावेळी पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ मागे घ्या, केंद्र सरकारचा धिक्कार असो आदी घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

त्यावेळी दत्ता माने, आनंदराव चव्हाण, सदा मलाबादे, भाऊसाहेब कसबे, वत्सला भोसले, सुभाष कांबळे, नुर बेळकुडे, धनाजी जाधव व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा