Breaking


देशव्यापी संप ; शिवणी गावातून केंद्र सरकारला पाठविले निवेदन


किसान सभा, डीवायएफआय, एसएफआयचा पुढाकार


बीड : देशभरात २८-२९ मार्च २०२२ रोजी शेतकरी व कष्टकरी वर्ग संपावर होता. देशातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संप आणि बंदला तालुक्यातील शिवणी गावातून पाठिंबा दिला. शिवणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बाबासाहेब घुमरे यांच्यामार्फत केंद्र सरकारला यानिमित्ताने निवेदन पाठविण्यात आले. यासाठी अखिल भारतीय किसान सभा, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने पुढाकार घेतला.


राज्यातील "या" जिल्ह्यांना पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा


केंद्र सरकारला पाठविण्यात आलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. (१) शेतकऱ्यांना २०२०चा पीक विमा देण्यात यावा. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना ताकीद द्या. (२) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किफायतशीर हमीभाव द्या. त्यासाठी MSPचा कायदा करा. (३) कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा. (४) सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण न करता त्यांना सक्षम करा. (५) बेघर कुटुंबांना घरकुल द्या. (६) रोजगार हमी योजनेच्या आर्थिक तरतूदीमध्ये वाढ करा. (७) दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजघटक आणि महिलांवरील अत्याचार थांबलेच पाहिजे. (८) बेरोजगार युवा वर्गाला शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार द्या. नोकर भरतीवरील बंदी उठवा. (९) विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्द करा. शिक्षणावरील एकूण खर्चात वाढ करा. (१०) राज्या-राज्यातील विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करणारी NEET परीक्षा रद्द करा, या मागण्या करण्यात आल्या.


महागाईचा भडका ! पेट्रोल-डिझेलनंतर आता 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार !


निवेदन देताना किसान सभेचे कार्यकर्ते आणि डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष कॉ. सुहास जायभाये, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, विजेश कुटे, शिवराज शिंदे, गोविंद सानप, शिवा चव्हाण, युवराज चव्हाण, नागनाथ माने, पंडित डोळस,नारायण घोडके, अक्षय कुटे, राजकुमार शिंदे, पंजाब शिंदे, बारीकराव डोळस, लक्ष्मण बनकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा