Breaking


महाराष्ट्रातील 3 हजार शाळा या एक शिक्षकी !


पुणे : महाराष्ट्र राज्यात १ लाख ९ हजार ९४२ शाळा असून राज्यात ३ हजार ४६६ (३.१५ टक्के) शाळा एक शिक्षकी असल्याचे समोर आले आहे. यात ३ हजार १९० शाळा शासनाच्या तर २७६ शाळा या खासगी आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हे वास्तव पुढे आले आहे.

३ हजार ४६६ एक शिक्षकी शाळांपैकी रत्नागिरी, पुणे, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर, सातारा, गडचिरोली, यवतमाळ व कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार २४४ (६४.७४ टक्के) आहेत.


रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती आजच अर्ज करा!


रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर या ४ कोकणातील जिल्ह्यांमध्ये एक शिक्षकी शाळांचे प्रमाण एकूण शाळांच्या तुलनेत ९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यातील शाळांमधून २ कोटी २३ लाख ५६ हजार ३३ विद्यार्थी शिक्षण घेत असून ७ लाख ७० हजार १२५ शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थी शिक्षक प्रमाण २९.०३ इतके आहे, तर शाळांमधून ७ लाख २८ हजार ८२५ वर्गखोल्या उपलब्ध असून विद्यार्थी वर्गखोल्यांचे प्रमाण ३०.६७ इतके आहे.


रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सातारा, गडचिरोली, यवतमाळ व कोल्हापूर या ९ जिल्ह्यांत २ हजार २४४ (६४.७४ टक्के) शाळा एक शिक्षकी आहेत.


रत्नागिरी जिल्ह्यात ३,२०१ शाळा असून त्यापैकी ३९६ (१२.४७ टक्के) शाळा या एक शिक्षकी आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात १.७३८ शाळा असून त्यापैकी २१४ (१२.३१ टक्के) शाळा या एक शिक्षकी आहेत.


रायगड जिल्ह्यात २,७२२ शाळा असून त्यापैकी २७३ (१०.३ टक्के) शाळा या एक शिक्षकी आहेत.


पालघर जिल्ह्यात ३, ४७४ शाळा असून त्यापैकी ३३६ (९.६७ टक्के) शाळा या एक शिक्षकी आहेत.


सातारा जिल्ह्यात ३,८६९ शाळा असून त्यापैकी २७३ (७.०६ टक्के) शाळा या एक शिक्षकी आहेत.


गडचिरोली जिल्ह्यात २,०६२ शाळा असून त्यापैकी १३५ (६.५४ टक्के) शाळा या एक शिक्षकी आहेत.


यवतमाळ जिल्ह्यात ३,३४८ शाळा असून त्यापैकी २०५ (६.१२ टक्के) शाळा या एक शिक्षकी आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यात ३,७०४ शाळा असून त्यापैकी १९५ (५.२६ टक्के) शाळा या एक शिक्षकी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा