Breaking

पे अँड पार्किंग चालते ! तर पे अँड हॉकिंग का नको ? - काशिनाथ नखाते


जर पार्किंग पॉलिसी चालते !  तर कायदेशीर हॉकर्स पॉलिसी का नको ? 


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून शहरातील प्रमुख रस्त्यावर पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यास आजपासून धडपड केली जात आहे. या शहरात जर श्रीमंताच्या वाहने लावण्यासाठी जागा दिली जाते मात्र गरिबांच्या हातगाड्या आणि स्टॉल लावण्यासाठी जागा का नाही, जर शुल्क आकारूण श्रीमंताच्या गाड्या पार्क करता येतात तर त्याच ठिकाणी शुल्क आकारून स्वयंरोजगाराचे साधन असलेला  गरिबांच्या  हातगाडी व स्टॉल धारकानां परवानगी का नाही ? असा परखड सवाल कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला‌.

यासाठी कष्टकारी संघर्ष महासंघातर्फे  पार्किंग पॉलिसी विरोधात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा त्यानी दिला आहे. आयुक्त व माजी महापौरा कडुन 
श्रीमंतांना पायघड्या आणि गरिबांना त्रास असे धोरण सुरू आहे. 


यावेळी इरफान चौधरी, मो.सलीम डांगे, राजू निसार, संभाजी पाटील, मुमताज शेख, मनीष हाके , बाबासाहेब घारे, किशोर ढेंबरे, अनिल ओव्हाळ, ओमप्रकाश अंबालाल सुकलाल, राम बिराजदार, विशाल मिहेर, जय गुप्ता, पप्पू कुशवाहा, देवीसिंग आहेर, फरीद सय्यद आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉलधारक सचोटीने व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत केंद्र सरकारने त्यांचेसाठी  कायदा केलेला असून राज्यामध्ये विविध ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र आयुक्तपदी राजेश पाटील नियुक्त झाल्यापासून आणि माजी महापौर शहरांमध्ये निवड  झाल्यापासून जाणीवपूर्वक कायद्याकडे दुर्लक्ष करून गोरगरिबांच्या टपरी, हातगाडीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.


एकिकडे हॉकर्स झोन च्या जागा निश्चित करून त्यांना कायमस्वरूपी जागा देण्यास टाळाटाळ केली जाते आणि श्रीमंतांच्या वाहन पार्किंग, बस, कार साठी इज्जतीत जागा दिली जाते हे अत्यंत चुकीचे आहे. कामगार कामगार नगरी मध्ये अनेक कामगार कष्टकरी विविध ठिकाणी कामावरती गेल्यानंतर पगारातील किती टक्के खर्च हा पार्किंग वरती करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील काही ठिकाण वगळता शहरात फार मोठ्या प्रमाणावर ती प्रशस्त रस्ते आहेत आणि या ठिकाणी  पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे अडथळा ठरत नाही असे असताना सुद्धा पार्किंग पॉलिसी नक्की कोणासाठी आणली जात आहे हा खरा प्रश्न आहे.  म्हणून नागरीकानीं याला वारंवार नाकारले आहे, म्हणून पार्किंग पॉलिसी यापूर्वी रद्द झाली आहे.

जर तुम्हाला पार्किंग पॉलिसी चालते तर हॉकर्स पॉलिसी का नसो नको असा सवाल कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र व पथारी, हातगाडी, स्टॉलधारक विचारत आहेत याचा जवाब देणे मनपाने देणे गरजेचे आहे. हॉकर्स पॉलिसी नुसार आम्ही हातगाडी पथारी धारक सुद्धा शुल्क द्यायला तयार आहेत. महापालिकेच्या उत्पन्नात भर होईल आणि आमचा रोजगार आरक्षित होईल जसं रस्त्याच्याकडेला पार्किंगला परवानगी आहे तसं हा हॉकर्स ला सुद्धा परवानगी देणे गरजेचे आहे अन्यथा हे शहर कामगार, कष्टकऱ्यांची नगरी आहे. अन्याय करण्याचा प्रयत्न झाला तर शहरातील कामगार कष्टकरी ते हाणून पाडतील यापुढे आंदोलन करण्यात येईल. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून अनेक वेळा पार्किंग पॉलिसी आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र यापूर्वी नागरिकांनी व वाहनचालकानीं त्यास विरोध केला, त्यामुळे पार्किंग पॉलिसी फसली होती ती पुन्हा एकदा सुरु करण्याचा प्रयत्न  केला जात आहे .

- क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा