Breaking

जनताच मोदी सरकारला संपवून थांबेल - कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे


बार्शी : आयटक कामगार केंद्राच्यावतीने 28, 29 मार्च 2022 रोजीच्या देशव्यापी संपाचा मोर्चा बार्शी मध्ये भगवंत मैदान येथून 28 मार्च 2022 रोजी विविध संघटना घेऊन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.


तहसील कचेरीवर मोर्चा पोहोचताच सभेत रूपांतर झाले यावेळी कॉम्रेड प्रा.तानाजी ठोंबरे म्हणाले "मोदी सरकार हे कामगार शेतकरी विरोधी आहे, जनतेने मोदी सरकारला जन्माला घातले, परंतु ते जनतेच्या विरोधामध्ये काम करत आहे, या संपाच्या निमित्ताने देशामध्ये कामगार लढाईला सुरुवात झाली आहे,  पुढील काळ हा तीव्र संघर्षाचा असेल जनताच मोदी सरकारला संपवून थांबेल."


मोर्चात केंद्र सरकारने संमत केलेले कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करा,  वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस,  खाद्य तेल, डाळी यांच्या किमती कमी करा,  बेरोजगारी थांबवा, हॉस्पिटल कर्मचारी व असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन 25 हजार रुपये करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या यावलकर समितीचा अहवाल स्वीकारावा व पूर्ण वेतन द्यावे, बांधकाम - घरेलू कामगार यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, बँकांचे खाजगीकरण थांबवावे, बार्शी टेक्सटाईल मिल चालू करावी या मुख्य मागण्या करण्यात आल्या.

मोर्चाचे निवेदन राधिका चांदणे व लक्ष्मी नेवसे यांच्या हस्ते तहसीलदार यांनी स्वीकारले तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची निवेदन कक्ष अधिकारी पाटील यांनी स्वीकारले. बार्शी टेक्सटाईल मिल चे निवेदन नागजी सोनवणे यांच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले.


यावेळी कॉ. एबी कुलकर्णी, कॉ.लहू आगलावे, एआयबीए च्या कॉ. सरिता कुलकर्णी, नागजी सोनवने, कॉ. शौकत शेख, कॉ. डॉ. प्रवीण मस्तूद, कॉ.अनिरुद्ध नखाते, भारत भोसले, बालाजी शितोळे, आनंद गुरव, पिंटू दळवी, भारती मस्तूद, धनाजी पवार, बिभीषण हुरकुडे, अनिल शिंदे, संदीप आलाट, दत्ता कोकरे, अमर मुजावर, भाऊसाहेब गोविंदे, बाजीराव धुमाळ आदींनी कष्ट घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा