Breaking


सांगलीत गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे चुलीवर भाकऱ्या करून भाजप सरकारचा निषेध


गॅस दरवाढ कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा माजी नगरसेविका विद्याताई कांबळे यांचा इशारा


सांगली : सांगलीतील भीमनगर येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात मोदी सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करीत झोपपट्टीतील महिलांनी चुलीवर भाकरी करून गँस दर वाढीचा व महागाईचा निषेध केला. या आंदोलनचे नेतृत्व माजी नगरसेविका विद्याताई कांबळे यांनी केले.

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल आहे. 


भारतात महागाईने आठ महिन्यात उच्चांक गाठलेला आहे, अशा परिस्थितीत घरगुती गॅस दरवाढीमुळे सामान्यांच्या डोक्यावर अधिक आर्थिक बोजा पडलेला आहे. याचा निषेध म्हणून विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे चुलीवर भाकऱ्या करुन आंदोलन करण्यात आले.

यावेळी मल्लवा कोठावळे, सुधा चिमलगी, मनिषा कांबळे, वंदना कांबळे, ज्योती इसरडे, रेणुका शिंगे, शशिकला गायकवाड, सखुबाई सूर्यवंशी, मानकि सरवदे, शालन कांबळे महिला आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा