Breaking

अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध - चेतन बेंद्रे


पिंपरी चिंचवड : पोलिसांच्या संगनमताने भाजपच्या गुंडांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी सुरक्षा कवच तोडून, सीसीटीवी व इतर संसाधनांची नासधूस करत मुख्यमंत्र्यांच्या जीवितास घातपात करण्याचा प्रयत्न केला, यांचा जाहीर निषेध आम आदमी पार्टी चे पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केला आहे ‌‌.


बेंद्रे म्हणाले, "भाजप केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही म्हणून ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आजची घटना म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता. पंजाबमध्ये आपचा विजय आणि भाजपचा पराभव यामुळे भाजपला अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची आहे. आजची हि कृती म्हणजे भाजपने  विचारांच्या लढाईत पराभव स्वीकारल्याचे लक्षण आहे."
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा